ask a question

नाम (Noun)


नाम ( Noun ) :-

नाम म्हणजे नाव .
वस्तूच्या , प्राण्याच्या आणि माणसाच्या नामाला  नाम असे म्हणतात.
जगातील कोणत्याही दिसणाऱ्या वस्तूला किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे विशिष्ट असे नाव दिलेले असते, त्याला नाम म्हणतात. 

जसे कि,
१) मयंक हुशार आहे.
वरील वाक्यात मयंक हे माणसाचे नाव आहे.
२) त्या कपात चहा आहे का ?
वरील वाक्यात कप हे वस्तूचे नाव आहे.
३) घोडा खिंकाळतो.
वरील वाक्यात घोडा हे प्राण्याचे नाव आहे.

काही उदाहरणे :-

मुलांची नावे    -  मयंक, क्षितिज, सुनील, समीर, रवी इत्यादी

मुलींची नावे    -  समीरा, रेणू, शीतल, रिया, ज्योती, सरिता  इत्यादी 

फुलांची नावे    - गुलाब, कमळ, लिली, सूर्यफूल, मोगरा, चाफा इत्यादी 

भाज्यांची नावे  - भेंडी, बटाटा, कांदा, मेथी, वांगे, गवार, दोडके इत्यादी

फळांची नावे   - आंबा, कलिंगड, अननस, पेरू, द्राक्षे, सफरचंद इत्यादी

प्राण्यांची नावे  - कुत्रा, गाय, सिंह, वाघ, माकड, हत्ती, मांजर, घोडा इत्यादी

पक्षांची नावे    -  चिमणी, कावळा, घुबड, पोपट, बदक, बगळा, कबुतर इत्यादी

वस्तूंची नावे    -  पुस्तक, दप्तर, टेबल, पंखा, कपाट, ताट, वाटी, चमचा इत्यादी

पदार्थांची नावे  -  भात, भाजी, चपाती, वरण, लाडू, चिवडा, चकली इत्यादी

रंगांची नावे     -  लाल, काळा, निळा, हिरवा, पोपटी, जांभळा इत्यादी 

नद्यांची नावे     -  गंगा, गोदावरी, नर्मदा, यमुना, कावेरी इत्यादी 

पर्वतांची नावे   -  हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य इत्यादी

दिशांची नावे   -  पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण इत्यादी

अवयवांची नावे -  हात, पाय, डोळा, कान, नाक, घसा इत्यादी 

काल्पनिक नावे - परी, राक्षस, स्वर्ग, नरक, कल्पतरू, चातक इत्यादी

नात्यांची नावे    -  आई, काका, मामा, भाऊ, बहीण, मावशी, आत्या इत्यादी

गुणांची नावे      -   हुशार, इमानदार, प्रामाणिक, शोर्य, साधेपणा  इत्यादी

मनातील भावांची नावे -  प्रेम, आदर, राग, दुःख, आनंद, उदास इत्यादी

या सर्व नावांना मराठी व्याकरणात नाम म्हणतात.


  

 

Browse topics on Marathi Grammar

time: 0.0226809978