लिंग (Gender)


लिंग  (Gender)  :-

खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पहा.
मुलगा खेळतो.
मुलगी खेळते.
वरील वाक्यांत मुलगा हे पुरुष जातीचे नाव आहे, व मुलगी हे स्त्री जातीचे नाव आहे.
माणसांमध्ये पुरुष स्त्री असा भेद असतो.

तसेच,
घोडा खिंकाळतो.
घोडी खिकाळते.
वरील वाक्यांत घोडा हे नर जातीचे नाव आहे, व घोडी हे मादी जातीचे नाव आहे.
प्राण्यांमध्ये नर मादी असा भेद असतो.

ज्या नामावरून  पुरुष  किंवा  स्त्री  जातीचा  बोध  होतो , त्यास लिंग असे म्हणतात .

नामाचे दोन प्रकार आहेत :-

पुल्लिंग ( तो ) Musculine
स्त्रीलिंग  ( ती ) Feminine


पुल्लिंग ( तो ) Musculine :- ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो , त्यास पुल्लिंग असे म्हणतात.  
उदाहरणार्थ : भाऊ , मामा  इत्यादी

पुल्लिंगी नामे 
तो  -  मुलगा
तो  -  लेखक
तो  -  बोका
तो  -  घोडा


स्त्रीलिंग  ( ती ) Feminine :- ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो , त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात.
उदाहरणार्थ : बहीण , मामी  इत्यादी

स्त्रीलिंगी नामे
ती  -  मुलगी
ती  -  लेखिका
ती  -  मांजर
ती  -  घोडी

लिंगबदल :-

पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी नामात रूपांतर करणे व स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर करणे , याला लिंगबदल असे म्हणतात.
(Note) लक्षात ठेवा :- वाक्यातील एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास क्रियापदाचे रूपही अनेकदा बदलते.

उदाहरणार्थ :-
मुलगा खेळतो.     -->>    मुलगी खेळते.
बैल गवत खातो.  -->>   गाय गवत खाते.

१) समान पद्धतीने होणाऱ्या काही नामाचा लिंगबदल :-

अ)  ( अ, आ   <-->  ई )
 
पुल्लिंग स्त्रीलिंग
काका  काकी
पाहुणा    पाहुणी
एकटा  एकटी
चिमणा चिमणी
काळा  काळी
छोटा  छोटी
चिमुकला चिमुकली
चित्रकार चित्रकर्ती
कणगा  कणगी
पिवळा  पिवळी
नवा नवी
कोंबडा  कोंबडी
कुमार कुमारी
गाडा  गाडी
कुत्रा कुत्री
ओला ओली
बकरा बकरी
म्हातारा म्हातारी
थैला थैली
पक्षी पक्षिणी
निळा निळी
नद  नदी
पोरगा पोरगी
नाचरा नाचरी
तरुण तरुणी
कोल्हा कोल्ही
बाहुला बाहुली
थोरला थोरली
देव देवी
दोरा दोरी
पावा पावरी
मामा मामी
मुलगा मुलगी
राजकुमार राजकुमारी
हिरवा हिरवी
विद्यार्थी विद्यार्थिनी
राग रागिणी
वानर वानरी
लांडगा लांडगी
स्वामी स्वामिनी
वेडा वेडी
मेंढा मेंढी
लाडका लाडकी
हंस हंसिनी
सखा सखी
शहाणा शहाणी
रेडा रेडी
सावळा सावळी

ब) ( अ, ई  <-->  ईण )
 
पुल्लिंग स्त्रीलिंग
शिपाई शिपाईन
सावकार सावकारीण
शिंपी शिंपीण
नाग नागीण
उंदीर उंदरीन
पोपट पोपटीण
कुंभार कुंभारीण
वाघ वाघीण
साप/सर्प सर्पीण
साहेब साहेबीण
हत्ती हत्तीण
शेतकरी शेतकरीण
ससा सशीण
सुतार सुतारीन
भिकारी भिकारीण
डुक्कर डुकरीण

क)  ( अ  <-->   आ , इका )
 
पुल्लिंग स्त्रीलिंग
शिक्षक शिक्षिका
नायक नायिका
शिष्य शिष्या
प्राध्यापक प्राध्यापिका
लेखक लेखिका
बालक बालिका
सेवक सेविका
कोकीळ कोकिळा
वृद्ध वृद्धा
मुख्याधापक मुख्याध्यापिका
मार्गदर्शक मार्गदर्शिका
गायक गायिका
शिक्षक शिक्षिका


२) अनियमित पद्धतीने होणारे नामाचे लिंगबदल :-
 
पुल्लिंग स्त्रीलिंग
मामा मामी
बाबा, वडील आई
दादा ताई
दादा वहिनी 
पुतण्या पुतणी
विद्वान विदुषी
आजोबा आजी
युवक युवती
राजा राणी
नर  मादी 
नोकर  नोकराणी
बैल गाय
पुत्र कन्या
गृहस्थ   गृहिणी 
बाप  आई, माय
मोर लांडोर
पुरुष  स्त्री, बाई
नवरा बायको
विद्वान  विदुषी 
वीर  वीरांगना
मित्र मैत्रीण
मासा  मासोळी
कवी  कवियत्री 
माता  पिता 
पुत्र  कन्या 
रेडा  म्हैस 
बोका  मांजर, भाटी 
बोकड शेळी, बकरी
गृहस्थ   गृहिणी 
बेडूक  बेडकी
साधू  साध्वी
सर  मॅडम
मुंगळा  मुंगी
बुआ  बाई
सासरा सासू 
काळवीट  हरिणी 
बंधू  भगिनी 
time: 0.0154910088