| अती तेथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला कि,त्याचा परिणाम नुकसानकारक ठरतो . |
| असतील शिते तर जमतील भुते | एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याच्याभोवती माणसे गोळा होतात. |
| अचाट खाणे म्हसनात जाणे | खाणे-पिणे हे शरीरपोषणासाठी असते याचे भान न ठेवता अतिरेक केल्यास त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. |
| अती शहाणा त्याचा बैल रिकामा | जो मनुष्य फार शहाणपणा करतो,त्याच्याकडून कोणतेही उपयॊगी किंवा मोठे काम होत नाही . |
| अहो रुपम अहो ध्वनी | एकमेकांचे दोष न दाखवता खोटी स्तुती करणे. |
| अडला हरी गाढवाचे पाय धरी | एखाद्या बुद्धिमान माणसालाही अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते . |
| अगं अगं म्हशी मला कोठे नेशी | स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. |
| असेल दिवाळी तर नसेल शिमगा | असेल तेव्हा भरपूर खर्च उधळपट्टी करणे, नसेल तेव्हा उपाशी राहणे. |
| अडली गाय फटके खाय | संकटात किंवा अडचणीत सापडलेल्यानाच अधिक त्रास दिला जातो. |
| अळी मिळी गूप चिळी | रहस्य उलघडू नये म्हणून सर्वांनी शांत बसणे. |
| अटक्याचा सोंठा, थेरझारा सौदा | अडल्या कामासाठी अधिक अडचणीत आलेल्या माणसांची केविलवाणी स्तिथी होणे. |
| अघळपघळ आणि घाल गोंधळ | मोठमोठ्या बाता करणारा माणूस कामात व्यवस्थित असतो. |
| अधिक सूट पाहुण्याकडे | अधिक सवलतीचा अधिक कामासाठी उपयोग करणे. |
| आला चेच तर केला देव नाहीतर हर हर महादेव | कोणतीही गोष्ट नियमितपणे करायची नाही. |
| आहेर नारळाचा आणि गर्जर वाजंत्र्याचा | थोडेसेच करायचे पण त्याचा गाजावाज मात्र अधिक करायचा. |
| आत्याबाईला मिशा आल्या तर काका म्हटले जाते | जी गोष्ट करणे शक्य नसते त्याबद्दल समर्थन करणे. |
| आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना | दोन्हीकडून अडचणीत आलेल्या माणसांची केविलवाणी स्थिती होणे. |
| आठ हात लाकूड नऊ हात ढलपी | महत्त्वाच्या गोष्टीपेक्षा इतर बाबींचा पसाराच अधिक. |
| आपला तो बाब्या दुसऱ्याचे कार्टे | स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. |
| आधी दिवा घरी नेला मग दुसरा मंदिरी ठेवा | प्रथम आपले घर सांभाळावे नंतर सार्वजनिक काम करावे. |
| आणतो उसनवारी, मिरवतो जमादारी | दरिद्री माणूस मोठेपणाचा आव आणतो. |
| आधी जाते बुद्धी मग जाते भांडवल | आधी माणसाचा विवेक नष्ट होतो नंतर त्याचे नुकसान होते. |
| आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास | मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे . |
| आज रोख उद्या उधार | पैसे देऊन विकत घ्यावे,उधारी ठेऊ नये . |
| आयत्या बिळावर नागोबा | कष्ट न करता,सहज मिळणाऱ्या संपत्तीवर कब्जा करणे . |
| आईजीच्या जीवावर बाईजी उदार | दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. |
| आईचा काळ बायकोचा मवाळ | आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा |
| आपलेच दात,आपलेच ओठ | आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे निर्माण झालेली अडचणीची स्थिती |
| आवळा देऊन कोहळा काढणे | क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. |
| आपला हात जगन्नाथ | आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. |
| आधी पोटोबा,मग विठोबा | पहिले पोटाची सोय पहावी,नंतर देवधर्म करावा . |
| आचार भ्रष्टी सदा कष्टी | ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. |
| आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली | अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. |
| आलीया भोगाशी असावे सादर | कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. |
| आधी शिदोरी मग जेजूरी | आधी भोजन मग देवपूजा |
| आले राजाजीच्या मना,तेथे कोणाचे चालेना | श्रेष्ठ व्यक्तीच्या इच्छेपुढे कोणाचे काहीही चालत नाही . |
| आपल्याच पोळीवर तूप ओढणे | फक्त स्वत:चाच फायदा साधून घेणे. |
| आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन डोळे | अपेक्षेहून जास्त मिळणे . |
| आंधळं दळत,कुत्रं पीठ खातं | एकाने काम करावे,त्याचा फायदा दुसऱ्याने घ्यावा . |
| इकडे आड तिकडे विहिर | दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती |
| इच्छा तसे फळ | जशी वासना असते तसे फळ मिळते. |
| इन मीन सव्वातीन | अगदीच अल्पसंख्या असणे. |
| उचलली जीभ लावली टाळ्याला | विचार न करता बोलणे. |
| उसवल्यास दोरा भरी, निसवल्यास काय करी | कोणतीही गोष्ट विकोपास गेल्यावर काहीही उपाय नसतो. |
| उथळ पाण्याला खळखळाट फार | अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. |
| उपट सूळ घे खांद्यावर | नसते लचांड मागे लावून घेणे. |
| उडाला कावळा, बुडाला तर बेडूक | निश्चित निर्णय न देणे. |
| उतावळा नवरा गुढघ्याला बाशिंग | अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे दर्शन. |
| उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे | श्रीमंत माणसांभोवती खुशमस्करे भोवतातच. |
| उधारीचे पोते, सव्वा हात रिते | उधारीने बेतलेला माळ नेहमीच कमी भरतो, मेहेरबानीने मिळालेल्या वस्तूत कमतरता असतेच. |
| उंदराला मांजर साक्ष | परस्परांच्या स्वार्थासाठी लबाड माणसांनी एकमेकांना साथ देणे |
| ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये | कोणत्याही चांगल्या गोष्टींचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नये. |
| एका हाताने टाळी वाजत नाही | दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देता येत नाही. |
| एका कानाने ऐकणे व दुसऱ्या कानाने सोडून देणे | एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे. |
| एक पुती रडे सात पुती रडे | सगळेच जण असंतुष्ट असतात. |
| एका माळेचे मणी | सगळेच सारखे, सगळेच सारख्या वृत्तीचे. |
| एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही | दोन सारख्या क्षमतेच्या व्यक्ती एकत्र राहू शकत नाही. |
| एवी न तेवी भर गो देवी | प्रतिकूल परिस्थितीत रडत बसून काय उपयोग? |
| एक ना धड भराभर चिंध्या | खूप कामे घेऊन एकही नीट न करणे. |
| ऐकावे जनाचे, करावे मनाचे | सर्वांचा विचार घ्यावा व आपल्यास योग्य वाटेल तेच करावे. |
| ऐतखाऊ गोसावी, ताळभैरव बैरागी | आळशी लोकांची कित्येक वेळा चंगळ असते. |
| कर नाही त्याला डर नाही | ज्याने वाईट कृत्य केले नाही, त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही. |
| कनवटीला नाही पैसा आणि लोकांना म्हणे या बसा | ऐपत नसताना बडेजाव करणे. |
| कसायला गाय धार्जीनी | लोक दुष्ट आणि कठोर माणसांशी नम्रतेने वागतात. |
| करावे तसे भरावे | जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे. |
| कागं बाई उभी,तर घरात दोघी तिघी | घरात पुष्कळ जण काम करायला असले की आळस चढतो |
| कामापुरता मामा | आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणारा. |
| काखेत कळसा, गावाला वळसा | जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे |
| कावळ्याच्या शापाने गाई मारत नसतात | क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही. |
| काम नाही कवडीची रिकामपण नाही घडीचे | काहीही काम नसतांना वेळच नाही असं दाखवणं. |
| कानामागून आली आणि तिखट झाली | श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. |
| कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच | मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. |
| कुठे जागी भोगा तर तुझ्यापुढे उभा | जे संकट येऊ नये असे वाटते तेच समोर येऊन उभे राहते. |
| कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ | स्वार्थासाठी किंवा केवळ दुष्टबुध्दीने, शत्रूला मदत करून आपल्याच माणसांचे नुकसान करणे. |
| केला तुका, झाला मका | दुसऱ्याच्यासाठी निर्माण केलेली अडचण स्वतःलाच भोगायला लागणे. |
| केश्या जाणे बारा, तर येश्या जाणे तेरा | शेरास सव्वाशेर असणे. |
| कोल्हा काकडीला राजी | क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूष होतात. |
| कोणाची म्ह्स, कोणाला उठबस | काम एकाचे त्रास दुसऱ्याला |
| कोळसा उगाळावा तितका काळाच | वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी, तितकी ती अधिकच वाईट ठरते. |
| कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं | लाजलज्जा पार सोडून देणे. |
| खर्याला मरण नाही | खरे कधी लपत नाही. |
| खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते | खर्च करणार्याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. |
| खाण तशी माती | आईबापाप्रमाणेच मुले |
| खाऊ जाणे ते पचवू जाणे | एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. |
| खायला काळ भुईला भार | निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. |
| खाई त्याला खवखवे | वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात डाचत असते. |
| खाऊन माजावे टाकून माजू नये | अन्न, पैसा किंवा तत्सम गोष्टी वाया घालू नयेत, त्याचा योग्य वापर करावा. |
| खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी | परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. |
| खोटयाच्या कपाळी सोटा | खोटेपणा करणाऱ्याला शिक्षा भोगावी लागते. |
| खोट्याच्या कपाळी गोटा | वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते. |
| खिळ्यासाठी नागलेला, नालासाठी घोडा गेला | क्षुल्लक गोष्टीत हयगय केली तर क्रमाक्रमाने मोठा अनर्थ होऊ शकतो. |
| ग ची बाधा झाली | गर्व चढणे |
| गरज सरो नि वैद्य मरो | आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे. |
| गवायचं पोर सुरातच रडतं | पिढीजात धंदा असेल तर तो सहज साध्य होतो. |
| गळ्यात पडले झुंड हसून केले गोड | गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते. |
| गळ्यातले तुटले ओटीत पडले | नुकसान होता होता टळणे. |
| गरजवंताला अक्कल नसते | गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते. |
| गणगोतानं भरलं गाव, तहान लागली विहिरीवर जावं | पुष्कळ नातेवाईक असले तरी प्रसंगी एकही मदत करीत नाही. |
| गर्जेल तो बरसेल (पडेल) काय | केवळ गाजावाजा किंवा बडबड करणार्या व्यक्तीच्या हातून काही कार्य घडत नसते. |
| गर्वाचे घर खाली | गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. |
| गाय व्याली, शिंगी झाली | अघटित घटना घडणे. |
| गाव तेथे महारवाडा | प्रत्येक ठिकाणी काहीतरी वाईट घडतेच |
| गाव करी ते राव ना करी | श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. |
| गाव जळाला, मारुती गावा निराळा | दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे. |
| गाढवाला गुळाची चव काय? | मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. |
| गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली | एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा उपयोग करून घेणे. |
| गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य | निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. |
| गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता | मुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो. |
| गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ | मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. |
| गाढवाच्या पाठीवर गोणी | एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा. |
| गाढव्या गावात गाढवी सवाशिणी | चांगल्याचा अभाव असतो तेथे सामान्य वस्तूलाही महत्व प्राप्त होते. |
| गाड्याबरोबर नळ्याची यात्रा | मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो. |
| गुरुची विद्या गुरूला फळली | एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. |
| गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य | ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे. |
| गोफण गेली तिकडे गोटा पडला इकडे | कोणत्याही कामात ताळमेळ नसणे. |
| गोगलगाय नि पोटात पाय | एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. |
| गोरागोमटा कपाळ करंटा | दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. |
| गोष्टी गोष्टी अन मेला कोष्टी | गप्पा गोष्टीच्या नादात कामधंदा बाजूलाच राहतो आणि नुकसान होते |
| घर ना दार देवळी बिर्हाड | बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती. |
| घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात | एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात. |
| घर पहावे बांधून लग्न पहावे करून | अनुभवाने माणूस शहाणा होतो. |
| घर ना दार देवळी बिर्हाड | शिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती. |
| घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे | अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे |
| घरी असतील तुरी तर संचार करतील पोरी | घरात सर्व सामग्री असेल तर घरगृहस्ती चांगली चालते. |
| घरात नाही कवडी म्हणे घेऊ शालजोडी | ऐपत नसतांना शानशौकत करणे. |
| घडाई परिस मडाई जास्त | मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे. |
| घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते | कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. |
| घरासारखा गुण सासू तशी सून | घराच्या चालीरीती बाबतीत लहान माणसे मोठ्यांचे अनुकरण करतात. |
| घरोघरी मातीच्या चुली | सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे. |
| घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी | आई कुठेही असली तरी तिचे आपल्या मुलांकडे लक्ष असते. |
| घे सुरी घाल उरी | फाजील उत्सुकता किंवा उत्साह शेवटी घटक ठरतो. |
| घोडे खाई भाडे | धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. |
| घेता दिवाळी देता शिमगा | घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. |
| घोडे कमावते आणि गाढव खाते | एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा. |
| घोडी मेली ओझ्यानं शिंगरू मेलं हेलपाट्यानं | काम करणारा कष्टाने मारतो तर कमी कुवतीचा त्याच्याबरोबर वावरल्याने मारतो. |
| तो पडेल | उत्कर्षासाठी धडपडणाऱ्याला अपयश आले तर त्यात कमीपणा नाही . |
| चार दिवस सासूचे,चार दिवस सुनेचे | प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची आयुष्यात संधी मिळतेच |
| चोराच्या मनात चांदणे | वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. |
| चव ना ढव, दडपून जेव | स्वयंपाकाला चव नसली तरी भरपूर जेवायला आग्रह करणे |
| चालत्या गाडीला खीळ | व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे |
| चांदणे चोराला, ऊन घुबडाला | चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाही |
| चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे | प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा महत्त्व प्राप्त होतेच. सर्व दिवस सारखेच नसतात |
| चाल बैला चाल, हरळीवर माती घाल | काही ना काही काम करा अथवा कमीत कमी काम करतो असे तरी दाखवा |
| चित्त नाही थारी, बावन तीर्थे करी | मनाला समाधान नसले, तर तीर्थयात्रा करूनही ते मिळत नाही |
| जगी सर्व सुखी असा कोण आहे ? | ज्याला सर्व सूखे प्राप्त झाली आहेत, असा या जगात कोणीही नाही |
| जन्मा घालील तो भाकर देईलच | जो आपणास जन्म देतो तो आपले पालनपोषण करतोच करतो |
| जसा गुरू तसा चेला | गुरू जसे शिक्षण देईल, तसेच विद्यार्थी तयार होतील |
| जसा भाव तसा देव | ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्याप्रमाणेच फळ मिळते |
| ज्याचा खावा ठोंबारा, त्याचा राखावा उंबरा | ज्याचे अन्न खावे त्याच्याशी एकनिष्ठ असावे |
| जिकडे सुई तिकडे दोरा | प्रमुख व्यक्तीच्या मागे त्याच्या हाताखाली काम करणारे लोक असतात |
| जित रोटी मेलिया माती | जिवंतपणी अन्न मेल्यावर मूठमाती |
| जे न देखे रवि ते देखे कवि | कवि आपल्या कल्पनेच्या जोरावर वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो |
| जेथे जेथे धूर तेथे अग्नी | कार्य आहे तेथे कारण असतेच |
| झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी | ज्या शक्य नाहीत अशा गोष्टी करणे |
| झाड जावो, पण हाड न जावो | नुकसान सोसावे, पण धर्मत्याग करू नये |
| झाकली मूठ सव्वा लाखाची | आपल्याजवळ जे आहे त्याविषयी न सांगितलेलेच बरे |
| टक्के टोणपे खाल्याशिवाय मोठेपण येत नाही | अनुभव आल्याशिवाय, संकटातून गेल्याशिवाय उन्नती होत नाही |
| टिटवी देखील समुद्र आटविते | क्षुद्र माणुसही प्रसंग पडल्यास मोठे कृत्य करू शकतो |
| डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही | कोणतीच गोष्ट साध्य होत नाही |
| डोळा तर फुटू नये आणि काडी तर मोडू नये | कसरत करत वागावे लागणे |
| डोळा तर फुटू नये आणि काडीवर मोडू नये | अत्यंत कुशलतापूर्वक कार्य करणे |
| ढोरात ढोर पोरात पोर | वाटेल तेथे समावणारा मनुष्य |
| ढोंग धत्तूरा, हाती कटोरा | ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास शेवटी नुकसानच होते |
| तरुण वकील, वृद्ध वैध | तरुण वकील तडफदार असतो व म्हातारा वैद्य तरुणापेक्षा अधिक चांगल्या रीतीने रोग ओळखतो |
| ताकापुरते रामायण | आपले काम साधण्यापुरते आर्जव |
| ताटाखालचे मांजर | दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असणे |
| तुकारामबुवाची मेख | अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट |
| तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले | दोन्हीकडून फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे, पण शेवटी निराशाच पदरी पडणे |
| तहान लागल्यावर विहीर खणणे | एखाद्या गोष्टीची गरज पडल्यावरच त्यावर उपाय शोधणे |
| तू नाही तर तुझा बाप | एखादे काम एकाने नाही केले तरी दुसरा करणारच आहे |