आलंकारिक शब्द (Analogical Words)


अष्टपैलू  अनेक चांगले गुण असणारा
अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस
अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस
अक्षरशत्रू निरक्षर माणूस, अडाणी 
अकलेचा कांदा मूर्ख मनुष्य 
अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे
अरुण्यरूदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
ओनामा  सुरुवात, प्रारंभ
अंगठा बहाद्दूर अशिक्षित 
उंबराचे फूल अगदी दुर्मिळ वस्तू
उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा
एरंडाचे गुऱ्हाळ कंटाळवाणे होणारे व्यक्त्यव्य
कळीचा नारद कळीचा नारद
कर्णाचा अवतार उदार मनुष्य
कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
काडिपहिलवान हडकुळा
कूपमंडूक संकुचित वृत्तीचा
कुंभकर्ण अतिशय झोपाळू 
कोल्हेकुई क्षुद्र लोकांची बडबड
खडाष्टक जोरदार भांडण
खडाजंगी मोठे भांडण
खुशालचेंडू अतिशय चैन करणारा
खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे 
गळ्यातला ताईत अतिशय प्रिय
गर्भश्रीमंत जन्मापासून श्रीमंत
गाजरपारखी मूर्ख,कसलीही पारख नसलेला
गंडांतर भीतीदायक संकट
गंगा-यमुना अश्रुधारा
गुळाचा गणपती मंद बुद्धीचा 
गुरुकिल्ली  रहस्य, मर्म
गोगलगाय गरीब स्वभावाचा निरुपद्रवी मनुष्य
घरकोंबडा घराबाहेर न पडणारा
घोरपड चिकाटी धरणारा 
time: 0.0435678959