शब्दसमूहाबद्दल एक शब्द (One word substitution)


“अ”       
काहीही माहेत नसलेला  अनभिज्ञ
जे माहीत नाही ते अज्ञात
ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू
ज्याला मरण नाही असा अमर
कधी जिंकला न जाणारा अजिंक्य
आधी जन्म घेतलेला अग्रज
अन्न देणारा अन्नदाता
ज्याला अंत नाही असा अनंत
ज्याला विसर पडणार नाही असा अविस्मरणीय
पायात काहीही न घालणारा अनवाणी
धर्मार्थ जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र
वर्णन न करता येण्यासारखा अवर्णनीय
फार कमी बोलणारा अबोल
अंग राखून काम करणारा अंगचोर
प्रत्यक्ष किंवा समोर नाही असे अप्रत्यक्ष
एखाद्याचे मागून घेणे अनुगमन
दुसऱ्यांचे पाहून त्यांच्यासारखे वागणे अनुकरण
घरी पाहून म्हणून आलेला अतिथी
जे साध्य होणार नाही ते असाध्य
कमी आयुष्य असलेला अल्पजीवी
अन्न देणारा अदाता
माहिती नसलेला अज्ञानी

“उ”
शिल्लक राहिलेले उर्वरित
लहान मुलास प्रथम अन्न खाऊ घालणारा उष्टावण
वाटेल तास पैसा खर्च करणे उधळपट्टी
दुसऱ्यावर जिवंत राहणारा उपजीवी
सूर्योदयापूर्वीची वेळ उष:काल
नदीची सुरुवात होते ते ठिकाण उगम
अगदी दुर्मिळ झालेली वस्तू / व्यक्ती उंबराचे फूल
उदयाला येत असलेला  उदयोन्मुख
लक्ष न दिले गेलेले उपेक्षित
ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा उपकृत
मर्मी लागेल असा स्वर, शब्द  उपरोध

“क”
कादंबरी लिहिणारा कादंबरीकार
कविता करणारा कवी
कविता करणारी कवियत्री
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष
अत्यंत उदार मनुष्य कर्णाचा अवतार
दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा कनवाळू 
काही निमित्त काढून आपसांत कलह माजविणारा कळीचा नारद
कलेची आवड असणारा  कलाप्रेमी
सतत कष्ट करणारा कष्टाळू
कार्य करण्याची जागा  कर्मभूमी
कड्यावरून लोटण्याची जागा कडेलोट
काळोख्या रात्रीचा पंधरवडा कृष्णपक्ष
देवालयाचे शिखराचे टोक  कळस
कानाना गोड वाटणारा  कर्णमधुर
आकुंचित मनाचा  कूपमंडक
सहसा न घडणारे क्वचित
दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी कपिलाषष्ठीचा योग
वयाने व अधिकाराने सर्वात कमी कनिष्ट
सर्वांचा संहारकर्ता व क्रूर असा शत्रू कर्दनकाळ
कमळाप्रमाणे डोळे असणारी कमलाक्षी

“इ”
पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाडपाल्याचे आवरण इरले
पूर्वी घडलेल्या हकीकतींचे वर्णन इतिहास

“ग”
एकाचवेळी अनेक जण बोलत असल्यामुळे होणार आवाज गलका
भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणे गहिवर
आकाशाचे भेद करणारा गगनभेदी
अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती गळ्यातील ताईत
वाडवडिलांचे पासून ज्यांचे घरात श्रीमंती आहे असा गर्भश्रीमंत
गाणे गाणारा गायक
हाताची किंवा पायाची बोटे झडून विकोपास गेलेला कृष्टरोग    गलतकुष्ट
दाराशी हत्ती झुलण्याइतकी संपत्ती गजान्तलक्ष्मी
ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसते गाजरपारखी
हिंडून करावयाचा पहारा गस्त
काळजात कालवाकालव झाल्यासारखे वाटणे गलबलने
देवळाचा आतील भाग गाभारा

“घ”
नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा
बऱ्याच मोठेपणी लग्न करण्यास तयार झालेला घोडनवरा
देवळाला कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा घुमट

“च”
ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रधारी
चार पाय असलेला चतुष्पाद
नक्षत्रासारखी सुंदर स्त्री चटकचांदणी
ज्या घराला छप्पर नसून वर चंद्र दिसतो असे मोडकळीस आलेले घर चंद्रमौळी
गावाच्या कामकाजाची जागा चावडी
शर्यतीत एकमेकांच्या सतत पुढे येण्याचा प्रयत्न चुरस
मन आकर्षून घेणारा चित्तवेधक
चार रस्ते एकत्र मिळालेले ठिकाण चौक
चित्रे काढणारा चित्रकार
इच्छिलेला देणारा मणी चिंतामणी

“ज”
जगाचा स्वामी जगन्नाथ
जन्मापासून उपजत गुण जन्मगुण
जेथे जन्म झालेला आहे तो देश जन्मभूमी
पाण्यामध्ये जन्मणारा प्राणी जलज
पाण्यात राहणारे प्राणी जलचर
अतिशय रागीट मनुष्य जमदग्नी
जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार
जिवाला जीव देणारा मित्र जिवलग
 
time: 0.0217480659