समानार्थी शब्द (Synonyms)


एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' समानार्थी शब्द ' होय.
समानार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये (
= ) चिन्ह देतात. 

उदाहरणार्थ :-

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

१) आजी मला रोज गोष्ट सांगते. 
२) पुस्तकातील नवनवीन कथा वाचण्याचा सईला छंद आहे.
३) राजूची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले.

गोष्ट म्हणजेच कथा म्हणजेच कहाणी.

गोष्ट = कथा = कहाणी 

या सर्व शब्दांचे अर्थ सामान आहेत. म्हणून गोष्ट, कथा, कहाणी  हे समानार्थी शब्द आहेत. 

पुढे पाहूया समानार्थी शब्द.


“अ”
शब्द समानार्थी  शब्द
अभिनेता नट 
अचानक एकदम
अमृत पीयूष
अपघात दुर्घटना
अचंबा आश्चर्य, विस्मय, नवल
अतिथी पाहुणा
अपराध दोष, गुन्हा
अडथळा आडकाठी, मनाई, मज्जाव 
अमाप भरपूर, खूप, पुष्कळ, विपुल 
आवाज नाद, निनाद, रव
आई माता ,जननी, माय, माउली, मातोश्री
आयुष्य जीवन
आसरा आश्रय, निवारा
आरसा दर्पण
आसन बैठक
आरोप आळ, तक्रार
आरोग्य तब्येत, प्रकृती
आज्ञा आदेश, हुकूम
आकाश आभाळ, अंबर, नभ, गगन, ख
आनंद हर्ष, खुशी, समाधान, मोद
आग्रह हट्ट, हेका, अट्टाहास
आठवण सय, स्मृती, स्मरण
ओसाड उजाड 
ओझे वजन, भार
ओळख परिचय
ओढा नाला, झरा, ओहोळ
अंत शेवट, अखेर, मृत्यू, मरण
अंग शरीर, देह, तनू, काया, कुडी, वपु
अंतराळ अवकाश

“उ”
उक्ती वचन
उजेड प्रकाश, तेज
उसळी उडी
उत्सव सण, सोहळा, समारंभ
उणीव कमतरता, न्यूनता
उमेद उत्साह, हिम्मत, धैर्य
उषा सकाळ, पहाट, प्रातःकाल, प्रभात, उषःकाल, अरुणोदय
उपहास मस्करी, थट्टा, चेष्टा
उत्सुक अधीर, आतुर, उत्कंठित

"इ",”ई”,”ऋ”,“ऐ”,”क्ष”,“ज्ञ”
इच्छा आकांशा, कामना
इन्कार नकार
इमानी प्रामाणिक, एकनिष्ठ, नेक
इतमाम थाट, सरंजाम, लवाजमा
इज्जत अब्रू
इतराजी नाखुषी, नाराजी
इंद्र सुरेंद्र, देवेंद्र, वज्रपाणी, पुरंदर, नाकेश, शक्र
ईर्षा चुरस
ऋतू मोसम
ऋण कर्ज
ऐट रुबाब, डौल
ऐपत कुवत
ऐक्य एकोपा, एकी, एकत्व, मिलाफ
क्षय झीज, नाश, ऱ्हास
क्षेम कुशल, कल्याण, हित
ज्ञान विद्या

“क”
कष्ट मेहनत, श्रम, परिश्रम
कमळ कमल, नीरज, पंकज, पद्म, अंबुज
कविता काव्य, कवन, पद्य
कवच आवरण, टरफल, आच्छादन
कपाळ ललाट, कपोल, भाल, निढळ
कथा गोष्ट, कहाणी, हकिकत
कलावंत कलाकार
करणी क्रिया, कृत्य, कृती
कळप समूह
करुणा दया
कामगिरी कार्य
काळजी चिंता, फिकीर, तमा, पर्वा, विवंचना
कावळा काक, वायस, एकाक्ष
किनारा काठ, तट
किल्ला गड,दुर्ग, तट, कोट
किंमत भाव, दर, मोल, मूल्य
कीर्ती प्रसिद्धी, ख्याती, नावलौकिक

"ख"
खचित नक्कीच, निश्चित, खात्रीशीर
खबर बातमी, वार्ता, माहिती, संदेश
खटारा बैलगाडी, छकडा
खजील शरमलेला, लज्जित, शरमिंदा, ओशाळा
खलाशी नावाडी, कोळी, नाखवा, खारवा
खटका भांडण, कलह, वाद, तंटा, झगडा
खट्याळ खोडकर, उनाड, हूड, उपद्व्यापी, द्वाड
खुळचट बावळट, भोळसट, खुळा
खुशी आनंद, प्रसन्नता, संतोष, समाधान, तोष

"ग"
गणपती विनायक, वक्रतुंड, गणेश, एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता, गौरीसुत, गजानन
गरुड खगेश्वर, खगेंद्र
गरीब लाचार, दुबळा, दीन, रंक, पामर
गरम उष्म, उबदार, उष्ण, तप्त
गरज आवश्यकता, जरुरी, निकड
गयावया विनवणी, काकुळती, याचना
गस्त राखण, रखवाली, पहारा
गदारोळ ओरड, गोंधळ, दंगा, हुल्लड
गबाळा बावळट, अजागळ, बावळा
गोपाळ कृष्ण, मुरलीधर, कन्हैया, मोहन, गोविंद
गोत कुळ, पिढी, गोत्र, वंश
गोड मधुर
गोषवारा तात्पर्य, सारांश, संक्षेप
time: 0.0198018551