समानार्थी शब्द (Synonyms)


एखाद्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे ' समानार्थी शब्द ' होय.
समानार्थी शब्द लिहिताना दोन शब्दांमध्ये (
= ) चिन्ह देतात. 

उदाहरणार्थ :-

पुढील वाक्ये नीट वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

१) आजी मला रोज गोष्ट सांगते. 
२) पुस्तकातील नवनवीन कथा वाचण्याचा सईला छंद आहे.
३) राजूची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आले.

गोष्ट म्हणजेच कथा म्हणजेच कहाणी.

गोष्ट = कथा = कहाणी 

या सर्व शब्दांचे अर्थ सामान आहेत. म्हणून गोष्ट, कथा, कहाणी  हे समानार्थी शब्द आहेत. 

पुढे पाहूया समानार्थी शब्द.


“अ”
शब्द समानार्थी  शब्द
अभिनेता नट 
अचानक एकदम
अमृत पीयूष
अपघात दुर्घटना
अचंबा आश्चर्य, विस्मय, नवल
अतिथी पाहुणा
अपराध दोष, गुन्हा
अडथळा आडकाठी, मनाई, मज्जाव 
अमाप भरपूर, खूप, पुष्कळ, विपुल 
आवाज नाद, निनाद, रव
आई माता ,जननी, माय, माउली, मातोश्री
आयुष्य जीवन
आसरा आश्रय, निवारा
आरसा दर्पण
आसन बैठक
आरोप आळ, तक्रार
आरोग्य तब्येत, प्रकृती
आज्ञा आदेश, हुकूम
आकाश आभाळ, अंबर, नभ, गगन, ख
आनंद हर्ष, खुशी, समाधान, मोद
आग्रह हट्ट, हेका, अट्टाहास
आठवण सय, स्मृती, स्मरण
ओसाड उजाड 
ओझे वजन, भार
ओळख परिचय
ओढा नाला, झरा, ओहोळ
अंत शेवट, अखेर, मृत्यू, मरण
अंग शरीर, देह, तनू, काया, कुडी, वपु
अंतराळ अवकाश

“उ”
उक्ती वचन
उजेड प्रकाश, तेज
उसळी उडी
उत्सव सण, सोहळा, समारंभ
उणीव कमतरता, न्यूनता
उमेद उत्साह, हिम्मत, धैर्य
उषा सकाळ, पहाट, प्रातःकाल, प्रभात, उषःकाल, अरुणोदय
उपहास मस्करी, थट्टा, चेष्टा
उत्सुक अधीर, आतुर, उत्कंठित
उपासना सेवा, भक्ती, पूजा, आराधना
उसंत सवड, फुरसत
उचै:श्रवा समुद्रमंथनातून मिळालेला घोडा, १४ रत्नापैकी एक रत्न

"इ",”ई”,”ऋ”,“ऐ”,”क्ष”,“ज्ञ”
इच्छा आकांशा, कामना
इन्कार नकार
इमानी प्रामाणिक, एकनिष्ठ, नेक
इतमाम थाट, सरंजाम, लवाजमा
इज्जत अब्रू
इतराजी नाखुषी, नाराजी
इष्क छंद, शृंगार, नाद, विषय प्रीती
इष्ट हितावह, इच्छित
इडापिडा सर्व दुःख
इंद्र सुरेंद्र, देवेंद्र, वज्रपाणी, पुरंदर, नाकेश, शक्र
ईर्षा चुरस
ऋतू मोसम
ऋण कर्ज
एकाग्र एकचित्त, स्थिर, एकतान
एहसान दया, उपकार, कृपा 
एटकर्णी  होणे एखादी गोष्ट बोलणारा व ती ऐकणारा या दोघांच्या पलीकडे तिसऱ्या माणसास ती कळणे,
जाहीर होणे
ऐट नखरा, दिमाख, रुबाब, डौल, ताठा, मिजास 
ऐदी आळशी, मंद, सुस्त
ऐपत कुवत
ऐक्य एकोपा, एकी, एकत्व, मिलाफ
ऐषआराम चैन, सुखोपभोग
ऐसपैस प्रशस्त, विस्तीर्ण, अमर्याद
क्षय झीज, नाश, ऱ्हास
क्षेम कुशल, कल्याण, हित
ज्ञान विद्या

“क”
कष्ट मेहनत, श्रम, परिश्रम
कमळ कमल, नीरज, पंकज, पद्म, अंबुज
कविता काव्य, कवन, पद्य
कवच आवरण, टरफल, आच्छादन
कपाळ ललाट, कपोल, भाल, निढळ
कथा गोष्ट, कहाणी, हकिकत
कलावंत कलाकार
करणी क्रिया, कृत्य, कृती
कळप समूह
करुणा दया
कसरत व्यायाम, सराव, मेहनत
कड एखाद्याचा राग शांत करणे 
कल्पना उपाय, युक्ती, शक्कल, तोड
कपडा वस्त्र, पट, वसन, अंबर
कळ युक्ती, यंत्र, वेदना, किल्ली, भांडणाचे मूळ
कठीण अवघड, बिकट
कपट खोटेपणा, लबाडी, डाव, डावपेच, कावा
करार  वचन, कबुली, ठराव 
कल्याण हित, क्षेम, कुशल 
कळस कलश, शिखर, टोक, घुमट
करडा कठोर, निर्दय, कडक, निष्ठुर 
कबूल मान्य, संमत, मंजूर, पसंत, अनुकूल
कलागत लावालावी, भांडण, कळ, वैर 
कणव कृपा, दया, माया, कीव, करुणा
कन्या मुलगी, लेक, पुत्री, तनया, तनुजा, सुता
कारस्थान कट, खल, मसलत 
कासव कच्छ, कमठ, कूर्म, कच्छप
कान कर्ण, श्रवणेंद्रिय
कामगिरी कार्य
काळजी चिंता, फिकीर, तमा, पर्वा, विवंचना
कावळा काक, वायस, एकाक्ष
किनारा काठ, तट, तीर
किरण रश्मी, कर, अंशू, मयूख 
किळस तिरस्कार, तिटकारा, वीट 
किल्ला गड,दुर्ग, तट, कोट
किंमत भाव, दर, मोल, मूल्य
किंतु परंतु, शंका, संशय
कीव दया, करुणा, कृपा
कील मेख, खिळा, पाचर
कीर्ती प्रसिद्धी, ख्याती, नावलौकिक
कुरापत खोडी
कुटाळी टवाळी, निंदा, कुचेष्टा, उपहास 
कुभांड लबाडी, आळ, कारस्थान, कट
कुडी शरीर, देह, दागिना 
कुत्रा श्वान 
केस रोम
कोमल नाजूक, सुंदर, मऊ, मृदू
कोंडा भुगा, चुरा, भूय, तूस 
कोंब मोड, अंकुर 
क्रम रांग, ओळ, अनुक्रम 

"ख"
खचित नक्कीच, निश्चित, खात्रीशीर
खबर बातमी, वार्ता, माहिती, संदेश
खटारा बैलगाडी, छकडा
खजील शरमलेला, लज्जित, शरमिंदा, ओशाळा
खलाशी नावाडी, कोळी, नाखवा, खारवा
खटका भांडण, कलह, वाद, तंटा, झगडा
खटला भांडण, परिवार, कुटुंब, कज्जा
खग पक्षी, पाखरू, द्विज, विहंग, अंडज
खरा सच्चा, सत्यवादी, प्रामाणिक
खट्याळ खोडकर, उनाड, हूड, उपद्व्यापी, द्वाड
खेद दुःख, वैषम्य, विषाद
खेडे गाव, ग्राम 
खेडूत गावकरी, ग्रामस्थ
खुळचट बावळट, भोळसट, खुळा
खुशी आनंद, प्रसन्नता, संतोष, समाधान, तोष
खुळा वेडा, मूर्ख, बावळा, अक्कलशून्य
खंड ग्रंथ, अध्याय

"ग"
गणपती विनायक, वक्रतुंड, गणेश, एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता, गौरीसुत, गजानन
गरुड खगेश्वर, खगेंद्र
गरीब लाचार, दुबळा, दीन, रंक, पामर
गरम उष्म, उबदार, उष्ण, तप्त
गरज आवश्यकता, जरुरी, निकड
गवई गायक
गयावया विनवणी, काकुळती, याचना
गस्त राखण, रखवाली, पहारा
गदारोळ ओरड, गोंधळ, दंगा, हुल्लड
गबाळा बावळट, अजागळ, बावळा
गाय गो, धेनू
गाव खेडे, ग्राम
गुन्हा अपराध
गुलाम दास
गीत गाणे, कवन, पद
गोष्ट कहाणी, कथा, हकिकत, सांगी
गोपाळ कृष्ण, मुरलीधर, कन्हैया, मोहन, गोविंद
गोत कुळ, पिढी, गोत्र, वंश
गोड मधुर
गोषवारा तात्पर्य, सारांश, संक्षेप
गोंगाट गोंधळ, गलका, गलबला
गौरव सन्मान
गंमत मजा, मौज
ग्रंथ पुस्तक

 "घ"
घर गृह, निवारा, सदन, निवास, निकेतन, भवन, आलय, धाम, आयतन
घन जलद, ढग, मेघ, पायोधर
घडामोड व्यवहार, उलथापालथ, फेरफार
घडी रचना, संच, बस्तान
घास गवत, चारा, तृण
घाव वार, आघात, प्रघात, तडाखा
घाट घडण, ठेवण, रचना, आकार
घाई गडबड, तातडी, त्वरा, जलदी
घोडा अश्व, वारू, तुरग, हय, वाजी

"च"
चपळ हुशार, चलाख, वेगवान, तल्लख
चव रुची, स्वाद, आस्वाद
चप्पल पादत्राण, जोडा, वहाण, पायताण
चकणा तिरळा, काना, तिरपा, तीरवा
चक्र चाक 
चवचाल कशीही वागणारी, स्वैर्य वर्तणूक असलेली
चबुतरा ओटा, कट्टा, उंचवटा, चौथरा
चाचणी तपासणी, परीक्षा, पारख
चाकर  गुलाम, सेवक, गडी, नोकर, दास
चाणाक्ष चलाख, चंट, चतुर, हुशार
चिवट  वातड, चामट, चिकट 
चिलट मच्छर, डास
चिळकांडी पिचकारी, चिपनळी
चिल्लीपिल्ली बालबच्ची, पोरे, मुलेबाळे, कच्चीबच्ची
चुटपुट हुरहुर, काळजी
चूप शांत, गप्प, स्तब्ध
चूर  गुंग, मग्न, गर्क, रममाण, तल्लीन
चेपणे  आवळणे, दाबणे 
चेहरा  मुख, तोंड, रूप, चर्या, तोंडवळा, मुद्रा, वदन
चंगळ  पुष्कळ, मुबलक, विपुल
चंचल अस्थिर, उतावळा, अधीर, स्वैर
चंद्र  चंद्रमा, इंदू, सोम, शशांक, निशानाथ, शशी, रजनीनाथ
चांदणे  चंद्रिका, ज्योत्स्ना, कौमुदी
चांगले  सुंदर, मनोहर
चांदी  रूपे, रजत 
चिंता  फिकीर, काळजी, विवंचना
चौकशी  विचारपूस 

" छ "
छेदने चिरणे, कापणे, तोडणे, छाटणे
छंद आवड, नाद

" ज "
जय यशस्वी, विजय, यश, सफल, सिदधी
जल पाणी, नीर, तोय, जीवन, उदक, सलील
जगनियंता जगाचे नियंत्रण करणारा
जवळ नजीक, निकट, समीप, सन्निध
जलद लवकर, शीघ्र, ताबडतोब, त्वरेने
जरब धाक, दरारा, वचक, दहशत 
जमीन धरती, भू, भूमी, भुई, धरणी, धरित्री 
जाड लठ्ठ, स्थूल 
जागा ठिकाण, स्थान, स्थळ
जागरूक दक्ष, जागृत 
जिणे जीवन, आयुष्य, अस्तित्व, जीवित, हयात
जीव प्राण
जुना पुरातन, प्राचीन, जीर्ण 
जुलूम छळ, अन्याय, अत्याचार, बळजोरी
जंगल वन, रान, अरण्य, कानन, विपिन

" झ "
झरा निर्झर
झगडा  भांडण, तंटा, वाद, कलह, झुंज, संघर्ष
झरने वाहणे, झिरपणे, पाझरने
झाड वृक्ष, तरु, द्रुम, पादप, रुख
झेप उडी, उड्डाण, सूर
झोप निद्रा 
झोका झोपाळा, झुला, दोला
झोपडी कुटीर, खोप
झीट भोवळ, मूर्च्छा, घेरी
झुकणे वाकणे, कलणे
झंझावात वादळ, तुफान, वावटळ 
झुंज युद्ध, लढा, संघर्ष, संग्राम, संगर 
झुंबड गर्दी, दाटी, जमाव
झेंडा ध्वज, पताका, निशाण

"ट", "ठ", "ड", "ढ"
टणक कणखर, मजबूत
टकळी वटवट, बडबड
टवटवीत सतेज, प्रफुल्लित, ताजा, तेजस्वी
टाकाऊ निरुपयोगी, कुचकामी, गुणहीन, व्यर्थ
टोलेजंग भव्य, अजस्त्र, प्रचंड
टंगळमंगळ टाळाटाळ, दिरंगाई, हवगय
ठग लुच्चा, फसवा, लुटारू, भामटा
ठळक जाड, स्पष्ट, मोठा, भरीव
ठाम निश्चित, दृढ, बिनचूक, खचित, निर्विवाद
ठाव तळ, बूड, खोली
ठीक बरोबर, उचित, योग्य, समर्पक
ठोसा धपाटा, रपाटा, तडाखा
डाकू चोर, दरोडेखोर, लुटारू
डोळा नयन, लोचन, नेत्र, अक्ष, चक्षू
डोके शिर, मस्तक, शीर्ष
ढग मेघ, घन
ढवळाढवळ लुडबूड, उलाढाळ, गोंधळ
ढोर गुरे, जनावरे (गाय, बैल, म्हैस इ.)
ढोंग सोंग, पाखंड, लबाडी
ढेकूण मत्कुण, खटमल
time: 0.0267400742