ask a question

सर्वनाम (Pronoun)


सर्वनाम (Pronoun)  :-
नामाऐवजी  जो  शब्द  वापरतात  त्याला " सर्वनाम " म्हणतात.

खालील वाक्ये वाचा .
मयंक  हुशार  मुलगा  आहे.
मयंक  नियमित  शाळेत जातो .
मयंकला  खेळायला आवडते.
मयंकचे मोहक व  रोनित मित्र आहेत.

वरील  वाक्यांमध्ये  मयंक  नामाचा  वारंवार  उल्लेख  झालेला  आहे. त्यामध्ये  बदल करून
ती वाक्ये वाचूया.

तो  हुशार  मुलगा आहे.
तो  नियमित  शाळेत जातो .
त्याला  खेळायला आवडते .
त्याचे  मोहक  व  रोनित  मित्र  आहेत. 

वरील वाक्यात मयंक या नामाऐवजी  तो, त्याला, त्याचे यासारखे  शब्द  वापरले  जातात , त्यांना  सर्वनाम  म्हणतात.

नामाचे  उच्चार  वारंवार होऊ नये  म्हणून  त्याऐवजी  मी ,  तू , ते , तो , ती ,  त्यांनी ,  त्याने ,  आपण , त्याला ,  त्याचे ,  त्याच्या  ,  आम्ही  यासारखे  शब्द  वापरले  जातात , त्यांना  सर्वनाम  म्हणतात.
सर्वनाम  हे  नामाच्या  ऐवजी  येते.  परंतु  त्या  अगोदर  नामाचा  उल्लेख  आवश्यक  असतो.

उदाहरणार्थ :-
मी, आम्ही माझे, आमचे ह्यांच्यात, त्यांच्यात तो, ती, ते
तू, तुम्ही तुझे, तुमचे त्याचे ,त्यांचे हा, ही, हे
मला, आम्हाला त्याचे, त्यांचे माझ्यात, आमच्यात माझे, आमचे
तुला, तुम्हाला ह्याचे, ह्यांचे तुझ्यात ,तुमच्यात तुझे, तुमचे


एकूण सर्वनामे (९) : मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः  इ.

वचनानुसार बदलणारी (५) : मी, तू,तो, हा, जो

लिंगानुसार बदलणारी (३) : तो, हा, जो

लिंग वचनानुसार न बदलणारी (४) : कोण, काय, आपण, स्वतः 

लिंग, वचनानुसार न बदलणारी (३) : तो, हा, जो 
time: 0.0883128643