सामान्य ज्ञान (General Knowledge)राष्ट्रीय 
राष्ट्रीय फूल कमळ
राष्ट्रीय फळ आंबा 
राष्ट्रीय प्राणी वाघ 
राष्ट्रीय पक्षी मोर 
राष्ट्रीय गीत वंदे मातरम
राष्ट्रध्वज  तिरंगा 
राष्ट्रगीत  जन-गण-मन
राष्ट्रपिता  महात्मा गांधी 

रंगाच्या छटा
पांढरा  पांढुरका,पांढराशुभ्र,सफेद
काळा  काळसर,काळाकुट्ट,काळिमा
लाल लालसर,लालभडक,लालिमा,लालेलाल
निळा  निळसर,निळाशार,निळाई
पिवळा पिवळसर,पिवळाधम्मक,पिवळाजर्द
हिरवा हिरवट,हिरवागार,हिरवाई
तांबडा तांबूस,तांबडालाल 

चव
गोड आंबा
कडू  कारले
आंबट लिंबू
तिखट मिरची
खारट मीठ 
तुरट आवळा

राजा
फुलांचा राजा गुलाब
फळांचा राजा आंबा
प्राण्यांचा राजा सिंह 
पक्ष्यांचा राजा गरुड
ऋतूंचा राजा वसंत

प्राणी आणि त्यांचे स्वभाव 
कोल्हा लबाड
घोडा चपळ 
सिंह हिंस्त्र
ससा  भित्रा 
कुत्रा इमानी
साप विषारी

सण व घटना
मकरसंक्रांत तिळगुळ देतात
गोकुळाष्टमी दहीहंडी फोडतात
गुढीपाडवा गुढी उभारतात
नागपंचमी नागाची पूजा करतात
रक्षाबंधन भावाला राखी बांधतात
दसरा सोने लुटतात 
दिवाळी पणत्या पेटवतात 
पोळा बैलाची पूजा करतात

कारागीर व त्यांची कामे
कुंभार मातीची भांडी तयार करतो
लोहार लोखंडाच्या वस्तू बनवतो
चर्मकार पादत्राणे बनवतो
माळी बागकाम करतो
विणकर कापड विणतो
शेतकरी शेती करतो
सुतार लाकडाच्या वस्तू बनवतो
सोनार सोन्याचे दागिने बनवतो
शिंपी लोकांचे कपडे शिवतो
गवंडी घर, इमारती बांधतो
धोबी लोकांचे कपडे धुतो
कारकून कचेरीची कामे करतो

थोर व्यक्तींची संबोधने
मोहनदास करमचंद गांधी महात्मा,राष्ट्रपिता
जवाहरलाल नेहरू पंडित,चाचा 
ज्योतिबा फुले महात्मा
बाळ गंगाधर टिळक लोकमान्य
दादाभाई नैरोजी पितामह
रवींद्रनाथ टागोर गुरुदेव
सुभाषचंद्र बोस नेताजी
वल्लभभाई पटेल सरदार,लोहपुरुष
नाना पाटील क्रांतिसिंह 
जयप्रकाश नारायण लोकनायक 
जोतिबा फुले महात्मा

थोरांच्या महत्वाच्या घोषणा
" चले जाव I " महात्मा गान्धी
" आराम हराम है I " पंडित नेहरू
" मेरी झासी नाही दूंगी I " राणी लक्ष्मीबाई
" जय जवान ! जय किसान ! " लाल बहादूर शास्त्री
" स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ! " लोकमान्य टिळक 
" तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा I  " सुभाषचंद्र बोस

लेखक-कवी व त्यांची टोपणनावे
नारायण सूर्याजी ठोसर संत रामदास
कृष्णाजी केशव दामले केशवसूत
त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवी
मुरलीधर नारायण गुप्ते बी
विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज
राम गणेश गडकरी गोविंदाग्रज
प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
time: 0.0401759148