ask a question

भारतीय महिला अंतराळवीर - कल्पना चावला


भारतीय महिला अंतराळवीर - कल्पना चावला

एखादी महत्वाकांक्षा ठेवणे, एखादे अशक्य कोटीतील स्वप्न पाहणे ते पूर्ण करण्यासाठी अटीतटीचे, पराकाष्ठेचे प्रयत्न करणे आणि शेवटी ते उद्दिष्ट सफल होणे असे एखाद्याच व्यक्तीच्या बाबतीत घडू शकते. महिला अंतराळवीर कल्पना चावला ही अशी एक महत्वाकांक्षी महिला होती.

कल्पना चावला यांचा जन्म १९६१ मध्ये हरियाणा राज्यातील 'कर्नाल'  या छोट्याश्या शांत वातावरण असलेल्या गावात  झाला. त्यांनी टागोर बाल निकेतन स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. पंजाब इंजिनीरिंग कॉलेज (हरियाणा) इथून एरोनॉटिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणारी त्या वेलची ती एकमेव विद्यार्थिनी होती. त्यानंतर १९८४ मध्ये तिने टेक्सास विद्यापीठातील एरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. १९८८ मध्ये कोलोराडो विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी त्यांना मिळाली. त्यानंतर तिने नासाच्या संशोधन केंद्रात आपले करिअर सुरू केले. भारताचा प्रथम अंतराळवीर राकेश शर्मा नंतर कल्पना चावला ही दुसरी अंतराळवीर होय.  

'नासा' या अमेरिकन अवकाश केंद्राने कल्पनाची अंतराळ मोहिमेसाठी निवड केली. कॅलिफोर्नियातील ' माऊंट व्हू ' या नासाच्या प्रयोगशाळेत तिने काम केले. कल्पना प्रथम १९९७ मध्ये अवकाशात झेपावली आणि साऱ्या भारतवासीयांची मान अभिमानाने ताठ झाली. १९९७ च्या मोहिमेत ती सुमारे ४०० तास अंतराळात राहिली. या काळात तिने अंतराळात ६५ मैलांचे अंतर पार केले. एकूण ७६० तास ती अंतराळात राहिली. २५२ वेळा तिने पृथ्वीप्रदक्षिणा केली.

१६ जानेवारी २००३ ला नासाहून कोलंबिया या अंतराळयानाची दुसरी मोहीम सुरु झाली. कल्पनाची ही पाच वर्षात झालेली दुसरी अवकाशयात्रा होती. विविध असाध्य रोगांवर औषधांचा शोध घेणे हा या मोहिमेचा हेतू होता. या प्रवासात कल्पना चावलाबरोबर सहा अंतराळवीर होते. हे सर्व जण आपली मोहीम पूर्ण करून पृथ्वीकडे परत येत असताना दि. १ फेब्रुवारी २००३ ला संध्याकाळी ७ वाजता 'कोलंबिया' दुर्घटनाग्रस्त होऊन टेक्सास राज्यातील फ्लोरिडा येथे खाली कोसळले. अंतराळात या अंतराळवीरांनी ८० प्रयोग केले होते. या अपघातात सर्व अंतराळवीरांचे दुःखद निधन झाले.

कल्पनाने आपल्या अल्प आयुष्यात आपणा सर्वांना खूप काही शिकवले आहे. कोणतेही स्वप्न मेहनतीच्या जोरावर प्रत्यक्षात येऊ शकते हे सिद्ध करून दाखवले. तिने आपल्यासमोर जे. आर. डी. टाटांचा आदर्श ठेवला होता. अत्यंत नम्र आणि दुसऱ्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर कल्पना अत्यंत आत्मविश्वासू होती. प्रसिद्धीच्या वलयाचा परिणाम तिच्यावर कधीही झाला नाही. ती गुणी, मेहनती आणि प्रामाणिक होती.  

कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ – Kalpana Chawla Achievements
१. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ आपल्या ‘मेट सॅट-१’ या अंतरीक्ष यानाचे नाव ‘कल्पना -१’ असे दिले होते. हरियाणा प्रशासनाने करनार येथील सरकारी दवाखान्याला ‘कल्पना चावला शासकीय दवाखाना’ असे नाव दिले आहे.
२. फक्त भारतच नव्हे तर अमेरिकेने सुद्धा कल्पना यांच्या सन्मानार्थ न्यू यॉर्क शहरातील ‘७४ जँक्सन हाईट’ या रस्त्याचे नाव बदलवून ‘कल्पना चावला’ रोड असे केले आहे.
३. कर्नाटक सरकारतर्फे ‘कल्पना चावला पुरस्कार’ हा लहान बालिका वैज्ञानिकांना दिला जातो.
४. भारतीय तांत्रिक संस्था, खरगपूर यांच्या एका विभागाचे नामकरण ‘कल्पना’ चावला विभाग असे आहे.
५. नासाने आपले एक सुपर संगणक कल्पना चावला यांना समर्पित केले आहे.

कल्पना चावला यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान – Kalpana Chawla Awards
१. नासा विशिष्ट सेवा पदक
२. काँग्रेशनल अंतराळ पदक
३. नासा अंतराळ उड्डाण पदक

भारताच्या अंतराळ इतिहासात कल्पना चावलाचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल. तिचे आयुष्य आणि तिचे काम हे जगातील प्रतिभावान मुलामुलींसाठी प्रेरणादायक ठरेल, तिच्या स्मृतीला प्रणाम !





 
time: 0.0130550861