ask a question

बालदिन


    दरवर्षी आपल्या भारतात १४ नोव्हेंबरला सर्व शाळांमध्ये "बालदिन" साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो कारण नेहरूंना लहान मुले खूप आवडत असत. ते कोठेही गेले तरी लहान मुलांमध्ये मूल होऊन रमत असत. म्हणून मुले त्यांना प्रेमाने " चाचा नेहरू " म्हणत. याच मुलांच्या हास्याखातर त्यांनी आपला जन्मदिवस त्यांना भेट म्हणून दिला. 
    जवाहरलाल नेहरू यांच्यामते, मुले देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. ते म्हणत असत की " कोणत्याही देशाची संपत्ती बँकेत नसते तर शाळेत सुरक्षित असते. "  हीच मुले उद्या नेता बनून राष्ट्राला योग्य मार्गदर्शन करतात. या मुलांवरच भारताचे भविष्य अवलंबून असते. बालकच समाज, राष्ट्र आणि कुटुंबाची आशा आहे.
बालदिनाच्या दिवशी मुलांना खास महत्त्व दिले जाते. देशभर मुलांसाठी विशेष कार्यक्रम सादर केले जातात. वाद-विवाद स्पर्धा, नृत्य, संगीत, नाटक, निबंध, खेळ आदी स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना बक्षिसे दिली जातात. मुलांना फळे, मिठाई वाटतात. दिल्ली येथे इंडिया गेटजवळ नॅशनल स्टेडियम वर मोठा समारंभ आयोजित केला जातो. मुले पंतप्रधानांसमोर सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करतात. पंतप्रधान मुलांना उपदेश करतात. देशभर मुलांसाठी विशेष कार्यक्रम सादर केले जातात. दूरदर्शनवर व आकाशवाणीवर मुलांचे कार्यक्रम होतात. अनेक ठिकाणी मुलांसाठी चित्रपट व नाटके सादर केली जातात. काही संस्था या दिवशी अनाथ-अपंग मुलांसाठी विशेष कार्यक्रम करतात. त्यांना खाऊ, खेळणी व नवे कपडे दिली जातात. मग ती मुलेही आनंदाने नाचतात-गातात.
    बालकदिनाच्या दिवशी केवळ बालकांच्या कल्याणाचाच विचार केला पाहिजे. प्राथमिक शिक्षण व्यवस्थित चालण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. बालमजुरी समाप्त केली पाहिजे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा याकडे शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे. मुलांना उत्तेजनपर बक्षिसे दिली पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जागृत होईल. हीच मुले शिकून देशाचे सैनिक बनतील. आदर्शांचा पाय मुलांमध्ये मजबूत असला पाहिजे. ज्यावर त्यांची शिक्षणरूपी इमारत भक्कमपणे उभी राहील व अविश्वासाच्या वादळात ती पडणार नाही. बालकदिनाचे आयोजन हाच दृष्टिकोन समोर ठेवून केले पाहिजे.
    प्रजासत्ताक आणि स्वात्यंत्रदिनाप्रमाणेच बालदिन ही मुलांसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी सर्वांचे सहकार्य मिळाले पाहिजे व उत्साहाने बालदिन साजरा केला पाहिजे. 
time: 0.0160880089